अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची लोकसभा सचिवालयाने गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ,  मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि  जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांना ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाचे उपसचिव बाला गुरुजी यांच्या स्वाक्षरीसह संबंधितांना पत्र देण्यात आले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत आंदोलन केले होते. त्या वेळी दोघांनाही पोलिसांनी आधी नजरकैदेत ठेवून नंतर पोलीसोयुक्तालयात नेले होते.

त्या वेळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी खासदाराचा अवमान केल्याची तक्रार नवनीत राणा यांनी संसदेच्या विशेष अधिकार समितीकडे दिली होती.  त्यानुसार येत्या ६ एप्रिल रोजी संबंधितांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यामध्ये पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनादेखील हजर राहावे लागणार आहे.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान