ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाचे होणारे आक्रमण ओबीसीमधील अनेक जातींचे नेते एकत्र मिळून अरबी समुद्रात बुडवू, असे आव्हान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिले आहे. आज पंढरपूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला. तसेच ओबीसी आरक्षणात जराही वाटा दिला जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

हे वाचा >> “मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण…”, ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांचा निर्धार

solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

अशी गरीबी आम्हालाही मिळावी..

तीन कोटी लोक दहा लाख गाड्यातून मुंबईत येणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. या घोषणेची खिल्ली उडविताना प्रकाश शेंडेग म्हणाले, “दहा लाख गाड्यांसाठी कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल-डिझेल लागेल. मराठा समाजाची सभा होते तेव्हा २०० जेसीबींमधून फुलं उधळली जातात. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते. असा एक गरीब मराठा समाज मुंबईत येऊन आंदोलन करणार आहे. आज आम्ही पंढरपूरमधून पांडुरंगाला साकडं घालतो की, अशी गरीबी आम्हालाही मिळू दे.”

मराठा समाजावर गरीबी कुणी आणली? असा प्रश्न उपस्थित करत असताना शेंडगे म्हणाले की, मागच्या ७५ वर्षांत मराठा समाजाचे नेतेच आमदार, खासदार झाले. मुख्यमंत्री आणि मंत्री झाले. याच लोकांनी मराठा समाजावर गरीबी आणली. मराठा समाजाला आत्महत्या करायला ओबीसींनी भाग पाडलेले नाही. तर मराठा नेत्यांच्या धोरणामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली.

एक भुजबळ पाडला तर १६० मराठे पाडू

छगन भुजबळ यांना मराठा समाज मतदान करणार नाही, ते कसे निवडून येतात ते पाहतो, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली होती. त्याचा समाचार घेताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, तुम्ही एक भुजबळ पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही १६० मराठे निवडणुकीत पाडू, असे प्रतिआव्हान शेंडगे यांनी दिले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे सभा असल्यामुळे त्यांनी या जिल्ह्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, या जिल्ह्यात एक-दोघांचा अपवाद सोडला तर सर्वच लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. यापुढे आमदार आणि खासदार आपलाच असला पाहीजे. त्यामुळे यंदा माढ्यातून ओबीसींचा खासदार निवडून पाठवायचा आहे. त्यासाठी जिवाचे रान करू आणि ओबीसी खासदार लोकसभेत पाठवू, असे शेंडगे यांनी जाहीर केले.

यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण, मराठा समाजानं स्वतंत्र १०, १२ किंवा १५ टक्के आरक्षण घ्यावं. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही.”