सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता.
दरम्यान, सोमवारी सायंकाळीही वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने त्यात अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगरात घराची भिंत अंगावर कोसळून गणेश संजय कट्टीमनी (१२, रा. भवानी पेठ, सोलापूर) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तो काही दिवसांपूर्वी आपल्या मामाच्या घरी मल्लिकार्जुन नगरात आला होता. या दुर्घटनेमुळे कट्टीमनी कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. मृत गणेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.त्यानंतर मंगळवारी दुस-या दिवशी पुन्हा अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, मंगळवारी सोलापूरचे तापमान ३९.९ अंशापर्यंत नोंदले गेले.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात दुस-या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले
सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता.
First published on: 27-05-2014 at 02:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odd time rain in solapur