सोलापूर : अवघ्या दीड महिन्यापूर्वी मित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ५५ वर्षांच्या विधवा पत्नीवर पाऊस पडत असल्याचे निमित्त साधून घरात घुसून लैंगिक अत्याचार केला. तिला धमकावत नंतर पुन्हा दोन वेळा अत्याचार केल्याप्रकरणी बालाजी सत्यनारायण नल्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वसाहतीत लैंगिक अत्याचार घडत होता. पीडित महिला विडी कामगार असून, दीड महिन्यापूर्वी तिचा पती मरण पावला. त्यामुळे पीडित विधवा घरात एकटीत राहायची. मृत पतीचा मित्र बालाजी नल्ला हा पूर्वी पतीसमवेत अधूनमधून घरी यायचा. पती वारल्यानंतर साधारण २० दिवसांपूर्वी पहाटे दोन वाजता बालाजी पीडित महिलेचा बंद दरवाजा ठोठावून, स्वतःचे नाव सांगितले. बाहेर पाऊस पडत असल्याने दरवाजा उघडण्यास सांगितले असता पीडित महिलेने त्यास घरात घेतले. बालाजी याने लगेचच दरवाजा बंद करून पीडित महिलेला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पुढे आठ दिवसांनी दुसऱ्यांदा रात्री उशिरा घरी घुसून त्याने पुन्हा हेच दुष्कृत्य केले. आषाढी एकादशीनंतर दोन दिवसांनी याची पुनरावृत्ती घडली.

हेही वाचा >>>CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

वारंवार होणाऱ्या या अत्याचारामुळे गर्भगळीत झालेल्या पीडित विधवेने आसपासच्या काही समजूतदार व्यक्तींकडे या अन्यायाबाबत सांगितल्यावर त्यांनी तिला मानसिक धीर दिला. त्यानंतर तिने वळसंग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. बालाजी नल्ला हा बेपत्ता झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीवर अत्याचार

सोलापुरात अत्याचाराची आणखी एक घटना घडली असून, यात रस्त्यावर ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणीला जवळच्या एका मोकळ्या मैदानावर नेऊन तिच्यावर दोघा जणांनी अत्याचार केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात इस्माईल इब्राहिम शेख आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सायंकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणी रिक्षाची वाट पाहत थांबली असता शेख व त्याचा मित्र दोघे तेथे आले आणि तुझ्यासोबत काही बोलायचे आहे, अशी थाप मारून तिला जवळच्या मैदानावर नेले. तेथे अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.