धाराशिव : तुळजाभवानी देवीवरील श्रध्देपोटी एका भाविकाने देवीला नवसपूर्ती म्हणून १९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण करून सेवा रूजू केली आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीवरील श्रध्देपोटी राज्यासह आंधप्रदेश, कर्नाटकातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू अर्पण करून नवसपूर्ती केली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देवीला भाविकांनी भरभरून दान दिले आहे. मागील आठवड्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचरणी तब्बल २८ लाखांची रोकड, १८ तोळे सोने आणि दोन किलो चांदी अर्पण केली होती. त्यात आणखी वाढ झाली आहे.

आणखी वाचा-२९४ कोटी पीकविम्यासाठी विमा कंपनीचे खाते सील

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी २३ हजार ४१७ भाविक तुळजापुरात दाखल झाले होते तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी १७ हजार ७९२ भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. सिंहासन पेटी, देणगी दर्शन, गोंधळ, जावळ, विश्वस्त निधी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सोमवारी देवीदर्शनासाठी आलेल्या सुमारे १८ हजार भाविकांनी २८ लाख ८ हजार रूपयांची रोकड देवीचरणी अर्पण केली आहे. मोठ्या श्रध्देने १९७ ग्रॅम ३८० मिली ग्रॅम सोने तर २ किलो ३३७ ग्रॅम चांदीचे दागिनेही तुळजाभवानी देवीच्या चरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आले आहेत. तुळजाभवानी देवीवरील श्रध्देपोटी एका भाविकाने देवीला नवसपूर्ती म्हणून १९० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण करून सेवा रूजू करत आपला भक्तीभाव अर्पण केला आहे.