रत्नागिरी स्थानकावर कोकणकन्या एक्स्प्रेमधील शौचालयामध्ये महिलेचा पाय अडकल्याची घटना आज घडली होती. त्यानंतर, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेचा पाय सुखरुप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. राबीया शेख (६८) असे शौचालयात पाय अडकलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला ठाण्याहून करमाळी गोवा असा प्रवास करत होती.
राबीया या प्रवासादरम्यान रात्रीच्या सुमारास रेल्वेच्या शौचालयात गेल्या त्यावेळी त्यांचा पाय त्यात अडकला. त्यानंतर महिलेचा पाय सुखरूप सोडवण्यासाठी डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला होता. मात्र शौचालयाचे होल आणि पायाचे माप सारखेच असल्याने पाय काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर, ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेच्या पायास कोणतीही इजा होऊ न देता सुखरुप सुटका करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
रेल्वेतील शौचालयात पाय अडकलेल्या वृद्ध महिलेस सहीसलामत बाहेर काढण्यात यश
ही महिला ठाण्याहून करमाळी गोवा असा प्रवास करत होती.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 11-12-2015 at 12:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old womans leg stuck in kokankanya express toilet