वेगात असलेली मोटारसायकल झाडावर आदळून चालक ठार झाला. वर्धा मार्गावर चिचभवनजवळ बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
सय्यद सोनुअली उर्फ जाहीदअली युसुफअली (रा. शिक्षक कॉलनी मोठा ताजबाग) हा हरीश मनोहर इटनकर याला घेऊन बुटीबोरीहून अॅपॅची मोटारसायकलवर (एमएच/३१/डीबी/१८४३) नागपूरकडे वेगात येत होता. चिचभवनजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर आदळली. या अपघातात सय्यद जागीच ठार झाला. हरिश जखमी झाला असून त्याला कोठारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुसरा अपघात काटोल मार्गावर फेटरीपासून दोन किलोमीटर आधी बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास घडला. वेगात असलेल्या मेटॅडोरच्या धडकेने ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. टाटा ४०७ मेटॅडोर (एमएच/४०/वाय/४६१) वेगात कळमेश्वरकडून नागपूरला येत होती. कळमेश्वरकडे जात असलेल्या मालवाहू ऑटो रिक्षाला (एमएच/४०/३७८८) धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षाचा चुराडा झाला. अपघात झाल्याचे दिसताच लोकांनी त्याला परस्पर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी मेटॅडोर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
मोटारसायकल झाडावर आदळल्याने चालक ठार
वेगात असलेली मोटारसायकल झाडावर आदळून चालक ठार झाला. वर्धा मार्गावर चिचभवनजवळ बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. सय्यद सोनुअली उर्फ जाहीदअली युसुफअली (रा. शिक्षक कॉलनी मोठा ताजबाग) हा हरीश मनोहर इटनकर याला घेऊन बुटीबोरीहून अॅपॅची मोटारसायकलवर (एमएच/३१/डीबी/१८४३) नागपूरकडे वेगात येत होता.
First published on: 29-11-2012 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One dead after bike hits tree