पंढरपूर : सावळ्या विठूरायाची नित्यपूजेसाठी संकेतस्थळावरून नोंदणी कालपासून सुरू होताच पहिल्याच दिवशी ३१ मार्च २०२५ पर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. या ‘ऑनलाईन’ नोंदणीला राज्यासह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

हेही वाचा : Chhatrapati Sambhajiraje : “पंकजा मुंडे स्वतः म्हणाल्या होत्या वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं…”, मस्साजोगच्या घटनेवरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजेसाठी अगोदर नोंदणी करण्याची पद्धत सुरू केली आहे. वेळ आणि श्रम यामध्ये बचत होते. ही नोंद करण्यासाठी मंदिर समितीकडून https://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून २६ डिसेंबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणी होताच केवळ एकाच दिवसात ३१ मार्च २०२५ पर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. या योजनेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. श्रींच्या नित्यपूजा, तुळशी पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.