पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन पहाटे ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे. दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असून फक्त ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. तसेच शासनाने तोंडावर मुखपट्टी, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी नियम बंधनकारक असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आणि सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सर्व मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत बैठक झाली. यानंतर या बैठकीतील निर्णय मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सहअध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनास परवानगी दिली आहे. तसेच सर्व भाविकांना दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची वेळ निश्चित करावी लागणार आहे. ज्या भाविकांनी अशा पद्धतीचे दर्शन बुकिंग केले त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच येणाऱ्या भाविकांनी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. याशिवाय येणाऱ्या भाविकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझरचा वापर, तोंडावर मुख्पट्टी असणे बंधनकारक आहे. एखाद्या भाविकाला ताप, सर्दी खोकला आदी लक्षणे दिसून आली तर त्या भाविकाला दर्शनास सोडण्यात येणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur vitthal temple to open for devotees sgy
First published on: 15-11-2020 at 19:40 IST