श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन वारीच्या काळात मंदिरात गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद आहे. पण आपण आणलेल्या भाविकांना आत सोडावे अशी आग्रही मागणी या सदस्याने केली होती. त्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने संबंधित समिती सदस्याने शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. कर्मचाऱ्यांनी आज (गुरूवार) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक माहिती अशी, मंदिर समितीच्या एका सदस्याने समितीच्याच कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या सदस्याने आणलेले लोक दर्शनास सोडण्यास समितीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या सदस्याने समितीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. येथे बसू नका, मंदिराच्या बाहेर निघून जा असा दम देत गोंधळ घातल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व कर्मचारी मंदिरातील सभा मंडपात एकत्र आले आणि संबंधीत सदस्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur wari vitthal rukhmini mandir samiti staff started protest of no work against mandir samiti member
First published on: 19-07-2018 at 12:33 IST