मुंबईत राहणाऱ्या ट्रान्सजेंडर पवन यादवने नुकताच एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन वकिलीच्या व्यवसायाला सुरूवात केली आहे. २६ वर्षांच्या पवन यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या तर देशातल्या दुसऱ्या ट्रान्सजेंडर वकील म्हणून ओळखले जात आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला आपली ओळख लपवावी लागली आणि खूप संघर्ष करावा लागला आहे. सर्वसामान्य समाजाकडून नेहमीच सन्मान न मिळालेला तृतीयपंथी समाज प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतो, असे पवनचे म्हणणे आहे.

ट्रान्सजेंडर असतानाच वकील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, हे सर्व त्याच्या आई-वडिलांमुळे घडल्याचे पवन यांनी म्हटले आहे. बहुतेक असे दिसून येते की जर एखाद्या पालकाला आपला मुलगा जन्मतः तृतीयपंथी असल्याचे कळले तर ते त्याच्यावर प्रेम करणे थांबवतात, त्याचा तिरस्कार करतात, समाज त्याच्याकडे दुसऱ्या नजरेने पाहू लागतो. त्यानंतर अशी मुले समाजापासून दूर जातात आणि मग त्यांना तृतीयपंथी समाजाची मदत घ्यावी लागते.

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत

पवन यांचा हा प्रवास तितकासा सोपा नसला तरी हे यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. शाळेत प्रवेश घेण्यासाठीही पवनला ओळख लपवावी लागली होती. पण त्यांच्या मेहनतीला फळ आले आणि तो वकील झाला.

पवन यादव यांच्या म्हणण्यानुसार, किन्नर समाजातील लोक आज प्रत्येक क्षेत्रात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असे लोक सतत त्यांच्या समाजात सामील होत आहेत जे तृतीयपंथींयाबद्दल लोकांची मते बदलण्याचे काम करत आहेत. त्यांना आशा आहे की एक दिवस असा येईल की जेव्हा किन्नर समाजातील लोकांना देखील चांगल्या नजरेने पाहिले जाईल, त्यांना तुच्छ लेखले जाणार नाही आणि त्यांना देखील समाजात स्थान मिळेल. हा सन्मान स्वत:साठी शासनाकडून मिळवून देण्याची लढाईही ते लढणार असून त्यांना हक्काचे ओळखपत्र मिळावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करणार आहेत. सध्या वकील पवन यादव आता मुंबईतील दिंडोसी कोर्टात प्रॅक्टिस सुरू करणार असून लवकरच लोकांना न्याय देण्याचे काम सुरू करणार आहेत.