संगमनेर: तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यात घडला. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातून लागोपाठ असे प्रकार समोर येत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. काल, मंगळवारी उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत दवाखान्यात गेली होती. तपासणी चालू असताना महिलेचा मुलगा बाहेर थांबला होता, तर पीडित महिला एकटीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, डॉक्टरने तिला दवाखान्यातील बेडवर झोपण्यास सांगितले. डॉक्टरच्या तोंडाला दारू प्यायल्यासारखा वास येत होता. टॉन्सिल तपासत असताना डॉक्टरने पीडित महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत. संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावरील एका नामांकित डॉक्टरने असाच प्रकार केल्याने गुन्हा दाखल झाला होता. मध्यंतरी बेकायदेशीर गर्भपात प्रकरण चर्चेत आले होते. आता पुन्हा असा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.