कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील कुशिरे तर्फ ठाणे येथील मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यावेळी कुशिरेतील मतदान केंद्रावर रांगेतून जाण्यावरुन झालेल्या वादामुळे कोडोली पोलीस ठाण्याचे हवालदार अभिजित शिपुगडे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिपुगडे जखमी झाले आहेत. या प्रकरणी कुशिरेचे सरपंच विष्णू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.