करोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांचे कौतुक होत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या नशिबी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हाल सोसण्याची वेळ येते आहे. रात्री कोरोना बाधित येऊनही एका पोलिसाला सकाळपर्यंत नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागले. रात्रभर रुग्णवाहिका आली नसल्याने कर्तव्य पूर्ण करुन सकाळी कर्मचार्‍याला दुचाकीवर रुग्णालय गाठावे लागले.

बीड जिल्ह्यातील परळी शहर ठाण्यातील 42 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा कर्मचारी बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यास होता. शुक्रवारी त थुंकीचे नमुने घेण्यात आल्यानंतरही शनिवारी नाकाबंदीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचार्‍याने दोन सहकार्‍यासह एका पोलीस अधिकार्‍यासोबत कर्तव्य बजावले. रात्री उशिरा कर्मचार्‍याचा अहवाल करोना सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. त्यांना तातडीने करोना कक्षात दाखल करणे गरजेचे होते. मात्र रुग्णवाहिका पाठवण्यात आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना बाधा झालेली असतानाही रात्रभर पोलीस कर्मचार्‍याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले. रविवारी सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर कर्मचारी दुचाकीवर जावून परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वाटेत त्याला काही त्रास होऊ नये म्हणून अन्य तीन सहकारी त्यांच्या दुचाकीच्या मागे वाहन घेऊन गेले होते. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली असून एका पोलीस कर्मचार्‍याला आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागला.