नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या आणि विकास रामअवतार खंडेलवाल यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल याच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि दाभोलकर यांना लागलेल्या गोळ्या यांच्यात साम्य आढळल्याने त्यांना अटक केल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी सांगितले.
नरेंद्र दाभोलकर यांची गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी पुण्यात हत्या झाली होती. या घटनेला सोमवारी पाच महिने उलटले असतानाच पोलिसांनी याप्रकरणी पहिली अटक केली. ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्य़ात ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसांनी नागोरीला अटक केली होती. त्याने अनेक पिस्तुले विकल्याचे तपासादरम्यान आढळून आले होते. तसेच दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले पिस्तुल या दोघांनीच पुरवल्याचे बॅलेस्टिक अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींचा ताबा पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे मागितला. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्यांना सोमवारी रात्री ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
दाभोलकर खूनप्रकरणी दोघांना अटक
नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या आणि विकास रामअवतार खंडेलवाल यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
First published on: 21-01-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police detain two suspects in dabholkar murder