महिलेची ८० लाख रुपयांची फसवणूक, ‘एसडीपीओ’च्या चौकशीत कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका

चंद्रपूर : वरोरा येथील एका महिलेची दिल्लीमधील युवकाने रिलायन्स टॉवर आणि कर्ज मिळवून देण्यासह वेळोवेळी वेगवेगळी प्रलोभने देऊन ८० लाख रुपयांनी फसवणूक केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी जप्त केलेला लॅपटॉप, मोबाईल संच व पंचनामा अहवाल आरोपपत्रात जोडला नसल्यामुळे आरोपीस जामीन मिळाला. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या व पोलीस अधीक्षक अरिवद साळवे यांच्या आदेशानुसार वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नौपानी यांनी केलेल्या चौकशीत तपासी पथकावर तपासात हयगय करून पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवून दोषी ठरवले आहे.

फसवणूक झालेली महिला, सुनीता माथनकर हिने पत्रपरिषदेत आपबिती सांगताना, रिलायन्स कंपनीचा एक विमा काढला होता. दिल्लीचा युवक प्रशांत नरेंद्र शर्मा याने डी. एस. रावत या नावाने फोन केला, तुम्ही रिलायन्स विमा काढला असून तुम्हाला पैसे हवे असल्यास त्या विमा वीस लाख रुपये कर्ज मिळवून देण्याची तयारी दर्शवली व त्यासाठी पंचेचाळीस हजार रुपये सुरक्षा ठेव भरण्याची अट घातली. वीस लाख रुपये मिळणार असल्याने सुनीता माथनकर यांनी ती रक्कम भरली.

यानंतर त्या युवकाने माथनकर यांना पुन्हा एक लाख रुपये मागितले. चार दिवसांनी फोन करून तुमच्या घरावर रिलायन्सचे टावर घेऊन त्यासाठी ८० हजार रुपये महिन्याप्रमाणे ८० लाख रुपये मिळेल. परंतु आयकर विभागाला साडेसात लाख रुपये द्यावे लागेत असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ७.५ लाख रुपये पाठवण्यात आले.

यानंतर घर, शेती विकून त्या युवकाने मागितल्याप्रमाणे कधी २ तर कधी ३ आणि एकदा २० व १४ लाख असे एकूण अंशी लाख रुपये त्या युवकाने सुनीता माथनकर यांचा विश्वास संपादन करून उकळले. यानंतरही पुन्हा पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. परंतु पैसे नसल्याने त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मात्र सदर युवकाने आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला जे करायचे ते करा तुम्ही दोघीच घरी राहता, तुम्हाला मारून टाकीन, अशाप्रकारची धमकी दिली.

दरम्यान, सुनीता माथनकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. माथनकर यांनी स्वत: पोलिसांसोबत जाऊन दिल्लीला आरोपीला पकडून दिले. आरोपीला वरोरा येथे आणल्यानंतर आरोपीने सुनीता माथनकर यांची ८० लाखांनी फसवणूक केल्याचे व त्यातून कार, प्लाट, फ्लॅट घेतल्याचे मान्य केले. तसेच त्यांना २५ लाख रुपये रोख व इतर रक्कमेचे दोन धनादेश असे ८० लाख रुपये देण्याचे कबूल केले. मात्र, त्याने पैसे दिले नाही. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना दिल्ली येथून जप्त केलेल्या वस्तू व पंचनामा अहवाल सादर केला नाही.

सदरची बाब माथनकर यांना माहिती होताच त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागितली. विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांनी पोलीस अधीक्षक साळवे यांना चौकशीचे आदेश दिले.

वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी चौकशीमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, पोलीस हवालदार धनराज करकाडे, पोलीस शिपाई निराशा अलोणे यांच्यावर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका असून पोलीस विभागाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहवाल देऊनही दोन महिन्याचा कालावधी लोटला असतानाही कोणतीही कारवाई झाली नाही. याप्रकरणी कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माथनकर यांनी सांगितले. घर, शेती विकून त्या युवकाने मागितल्याप्रमाणे कधी २ तर कधी ३ आणि एकदा २० व १४ लाख असे एकूण अंशी लाख रुपये त्या युवकाने सुनीता माथनकर यांचा विश्वास संपादन करून उकळले. यानंतरही पुन्हा पैसे उकळण्याचा प्रयत्न झाला. परंतु पैसे नसल्याने त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मात्र सदर युवकाने आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला जे करायचे ते करा तुम्ही दोघीच घरी राहता, तुम्हाला मारून टाकीन, अशाप्रकारची धमकी दिली.