सांगली : मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी केली.

विट्यात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उद्योग मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, शंकरनाना मोहिते, केमिस्ट असोसिएशनचे विजय पाटील आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-जालन्यातील घटनेचे हिंगोलीत तीव्र पडसाद; जमावाने सरकारी गोदामाला लावली आग, लाखोंचं नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, आर्थिक निकषावर आधारित मराठा समाजाला आरक्षणाची मागणी सर्वात प्रथम १९८२ मध्ये स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. तेव्हापासून मराठा समाजाचा आरक्षण मागणीसाठीचा लढा सुरू आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, आर्थिक उन्नती साधावी एवढीच आमची मागणी आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आंदोलन करणारा मनोज जारांगे पाटील हा युवक गेल्या चारपाच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. चुकीच्या पध्दतीने तो काही करणारा नाही. आंदोलकांवर लाठीहल्ला, गोळीबार करण्यासारखी स्थिती नसतानाही असे आदेश देणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे श्री. पाटील म्हणाले.