राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. परंतु नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, मात्र काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर यावर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटेल म्हणाले, माझ्यासाठी अशी जबाबदारी नवीन नाही. मी खूप वर्षांपासून पवार साहेबांबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करत आलेलो आहे. जी जबाबदारी दिली असेल ती आजवर मी पार पाडत आलो आहे. माझ्यासाठी आता पदोन्नती काही नवीन गोष्ट नाही.

ajit pawar
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाच्या कार्यध्यक्षपदी निवड होणं ही आनंदाची बाब पण ही नवीन गोष्ट नाही. त्याचबरोबर सुप्रियाताई देखील सोबत आहेत. त्यासुद्धा अनेक वर्षांपासून पक्षासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांची निवड होणं ही देखील चांगली गोष्ट आहे. एक नवीन नेतृत्व भविष्यासाठी तयार करावं अशी साहेबांची मानसिकता असावी, असं मला वाटतं. मलाही आज सकाळी इथे आल्यानंतरच समजलं की आपली या पदासाठी निवड झाली आहे. प्रफुल्ल पटेल एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आला की, पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक झाल्यावर तुमच्यासमोरचं पहिलं आव्हान काय असेल? यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं हे पहिलं आव्हान असेल. पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं ही सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. अशा आणखी दोन तीन राज्यांमध्ये आमचे जास्तीत जास्त आमदार आणि मतांची टक्केवारी आणणं हे आमचं आव्हान असेल. त्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल.