भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांमधली खडाजंगी सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपावर हल्लाबोल करत आहेत. तर भाजपा नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. आजच्या (६ एप्रिल) ‘सामना’च्या अग्रलेखातून राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केलं. यावर प्रश्न विचारल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, जे आधी रात्री फुकायचे ते आता दिवसा देखील फुकतात.

लाड म्हणाले की, “जे लोक रात्रीचे फुकायचे ते आता सकाळी पण फुकून बोलायला लागले आहेत. त्या फुकऱ्यांबद्दल काय बोलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे. फुकरे हे फुकरेच असतात, या फुकऱ्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही.”

राज्यात तीन पैशांचा तमाशा : लाड

सामनाच्या अग्रलेखात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा चवण्णी असा उल्लेख केला आहे. त्यावरून लाड म्हणाले की, राज्यात तीन जणांचा तीन पैशांचा तमाशा सुरू आहे. त्यांना चवण्णी-अठण्णी बोलायची सवय असते. या तीन पैशांचा तमाशावाल्यांना आम्ही त्यांच्या भाषेत वेळ आल्यावर उत्तर देऊ.

हे ही वाचा >> “…तेव्हा माझ्यावर दारुवाली बाई अशी टिप्पणी झालेली”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “राजकारणात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर (ठाकरे गट) हल्ला चढवला. राणे यांच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, “नारायण राणेंचं नाव घ्यायलाही आम्हाला लाज वाटते. कोण आहेत हे लोक, यांनी १० वेळा पक्ष बदलले, आपल्या आईला बदललं. जो आपली आई बदलतो, त्यांच्यावर आम्ही काय बोलावं. ते मंत्री बनले आहेत. बेईमान लोकांना मंत्रीपद देणं भाजपाची सवय झाली आहे. यात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, जोतिरादित्य शिंदे असो की एकनाथ शिंदे, नारायण राणे.”