कोल्हापुरातील भीषण पूर परिस्थिमुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत. सर्व पक्षाचे आणि विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मद्दत पोहोचवत आहेत. तसेच राज्य सरकारकडूनही गुरूवारी पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून त्यांना मदत पोहोचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरात अडकलेल्या तसेच विस्थापित झालेल्या लोकांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. याव्यतिरिक्त त्यांना चादर, औषधे आणि राहण्यासाठी अन्य ठिकाणी जागा घेतली असल्यास त्याचे भाडे देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या संकटाला कोणीही घाबरू नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार आणि सर्व सदस्य यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
महेश जाधव 9373480015
वैशाली क्षीरसागर 9960847070
विजय पवार 998335190
शिवाजीराव जाधव 9922224500