भाऊ आहे मोठा, खर्चाला नाही तोटा.. होऊ दे खर्च.. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेले हे घोषवाक्य केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी वास्तवात उतरवण्याचा चंग बांधला आहे. कनिष्ठ बंधू विशाल पाटील यांच्या विवाहासाठी शाही खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. विवाहसोहळ्यासाठी तब्बल दीड लाख पत्रिका छापण्यात आल्या असून दीड लाख चौरस फुटांचा शामियानाही उभारण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने लग्नाबरोबरच जनसंपर्कही वाढवण्यासाठी हा खटाटोप चालवला असल्याची चर्चा आहे.  दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले विशाल पाटील यांचा विवाह पुण्याचे सूर्याजी जाधव यांची कन्या पूजा यांच्याशी होत आहे. उद्या, रविवारी हा विवाह होणार आहे. हा सोहळा सांगलीकरांच्या कायमचा स्मृतीत राहील अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी आयोजकांचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी ही तयारी
* क्रीडा संकुलाच्या बारा एकर जागेवर शामियाना उभारणी.  व्हीआयपींसाठी एक एकर जागेवर वातानुकूलित शामियाना
* दीड लाख रुपये भाडे निश्चिती. दीड लाख लग्नपत्रिकांची छपाई.
* सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंत सर्वाना निमंत्रण. वाहनांच्या पाìकगसाठी ३२ एकर मैदान सपाट
* अन्य १२ एकर जागेवर मंडप उभारणी.  एकाचवेळी २० हजार लोकांच्या पंगती उठवण्याची व्यवस्था

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratik patil brothers wedding too expensive
First published on: 22-02-2014 at 12:01 IST