scorecardresearch

सांगली: पहिल्या महाराष्ट्र महिला केसरीसाठी प्रतिक्षा आणि वैष्णवी यांच्यात लढत

शुक्रवारी झालेल्या उपांत्य स्पर्धेत प्रतिक्षा बागडी व वैष्णवी पाटील या दोघींनी प्रतिस्पर्धींना पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

pratiksha-vaishnavi
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी आणि कोल्हापुरची वैष्णवी पाटील यांच्यात लढत होत आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या उपांत्य स्पर्धेत प्रतिक्षा बागडी व वैष्णवी पाटील या दोघींनी प्रतिस्पर्धींना पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सांगली जिल्ह्यातील तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कोल्हापूरची पैलवान अमृता पुजारी या दोघींच्या मध्ये उपांत्य फेरीत कुस्ती झाली होती, ज्यात प्रतीक्षाने ९-२ ने अमृताचा पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीसाठी निवड झाली.

दुसऱ्या उपांत्य फेरीत कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील आणि कोल्हापूरची पैलवान वैष्णवी कुशप्पा या दोघींमध्ये कुस्ती झाली, ज्यात ११-१ ने वैष्णवी कुशप्पाचा पराभव करत वैष्णवीने महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीसाठी प्रवेश निश्चित केला.महिला केसरीसाठी सायंकाळी प्रतिक्षा व वैष्णवी यांच्यात सायंकाळी कुस्ती होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 11:48 IST

संबंधित बातम्या