राज्यातील सध्याची करोना बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच पालकांना आपलं मुल सुरक्षित राहील, अशी खात्री वाटत असेल, तरच त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी अजित पवार म्हणाले की, करोना बाधित रुग्णांचा दर कमी असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ, टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आता १ मार्चपासून जम्बो रूग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील करोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. सध्या कोरोना आकडेवारी घट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre primary schools will reopen from 2 march says ajit pawar svk 88 hrc
First published on: 26-02-2022 at 13:26 IST