भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पंकजा मुंडे यांचं पक्षाअंतर्गत खच्चीकरण केलं जात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. असं असताना भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं एक विधान चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभाव्यात, असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं आहे. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- “थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

यावेळी उपस्थितीतांना संबोधित करताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जसं होतं, त्यापेक्षा अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून केला आहे. मागील पाच वर्षात अंबाजोगाई शहराला चारही बाजुंनी राष्ट्रीय महामार्गांनी वेढण्याचं काम करण्यात आलं आहे. मी हे यासाठी सांगतेय की, आपण जेवढ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊ, तेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगाला चालना मिळते.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, कारण…” निलेश राणेंची बोचरी टीका!

त्यामुळे येथून पुढच्या काळातही आपण असं काम करतच राहू. यासाठी पंकजा मुंडे पुन्हा एकदा आपल्याला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून लाभाव्यात. ज्यामुळे मागील काही काळात बीड जिल्ह्याचा जो अनुशेष बाकी राहिला आहे. तो त्यांच्या माध्यमातून भरून निघेल. यासाठी पंकजाताई तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा जास्त जिल्ह्याला शुभेच्छा देते, असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preetam munde statement on pankaja munde beed district guardian minister rmm
First published on: 27-09-2022 at 17:02 IST