न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेश जैन यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या करत असलेले आरोप व त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र म्हणजे जैन यांनी हजारेंविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठीचे दबावतंत्र असल्याचा आरोप येथील जैन समर्थकांनी केला आहे.
महापौर जयश्री धांडे, मौलाना आझाद विचार मंच, करीम सालार, व्यापारी महासंघाचे पुरुषोत्तम टावरी, जळगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग व गनी मेनन यांनी या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे. जैन यांना अटक झाल्यावर ते आजारी असल्यामुळे सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हजारेंविरुद्ध जैन यांनी जळगाव न्यायालयात खटले दाखल केले असून न्यायप्रविष्ट आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
अण्णा हजारेंकडून दबावतंत्राचा अवलंब
न्यायालयीन कोठडीत असलेले आ. सुरेश जैन यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या करत असलेले आरोप व त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र म्हणजे जैन यांनी हजारेंविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठीचे दबावतंत्र असल्याचा आरोप येथील जैन समर्थकांनी केला आहे.
First published on: 04-12-2012 at 05:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure from anna hazare