बलात्कार व खूनप्रकरणी अटकेत असणा-या एका कैद्याचा सोमवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या कैद्याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी संशय व्यक्त केला असून, चौकशीची मागणी केली आहे.
सागर नंदकुमार हात्तेकर (वय २७, रा. कुंडल) हा आरोपी ऑक्टोबर २०१२ पासून सांगलीच्या कारागृहात आहे. विटा येथे एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणी त्याच्यासह चौघे जण सांगलीच्या कारागृहात आहेत. हात्तेकर हा गेल्या दीड वर्षांपासून आजारी असून, त्याला हृदयविकार व रक्तदाबाचा त्रास सुरू होता. कारागृह प्रशासनाने रात्री १२ वाजता त्याला रक्ताच्या उलटय़ा झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांनी सागर याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले असून चौकशीची मागणी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
अटकेत असणा-या कैद्याचा उपचार सुरू असताना मृत्यू
बलात्कार व खूनप्रकरणी अटकेत असणा-या एका कैद्याचा सोमवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या कैद्याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी संशय व्यक्त केला असून, चौकशीची मागणी केली आहे.

First published on: 27-05-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prisoners death during treatment