अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी सुपूर्द करण्यात आला. ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे आयोजित करण्यात आले असून, मराठी भाषा विभागाच्या वतीने हा निधी देण्यात आला आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, निमंत्रक रावसाहेब पवार, कोषाध्यक्ष सुनिल महाजन, स्वागताध्यक्ष विजय कोलते, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, सदस्य माऊली मेमाणे, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते. याशिवाय मराठी भाषा विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदींची देखील उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2013 रोजी प्रकाशित
साहित्य संमेलनासाठीचा २५ लाखांचा निधी महामंडळाकडे सुपूर्द
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी सुपूर्द करण्यात आला.

First published on: 26-12-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan given funds to marathi sahitya sammelan