राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी चार दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ शनिवारी कोकण विभागातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील महसूल कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले होते. रिलायन्स गॅसवाहिनींच्या मुद्दय़ावरून कर्जतचे आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना भर सभेत मारहाण केली होती.   लाड यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.  शनिवारी संपूर्ण कोकणातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • रायगड जिल्ह्य़ातील कोतवालापासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जवळपास दीड हजार अधिकारी- कर्मचारी या आंदोलनात सहभागी

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest movement in mumbai over ncp suresh lad
First published on: 21-08-2016 at 00:36 IST