राहाता: देशात आणि राज्यात भाजपला मोठा जनाधार मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच राज्यात महायुतीची सत्ता येऊ शकली. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही यश आपलेच आहे. शत-प्रतिशत भाजपसाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

भाजपच्या शिर्डी शहर मंडलाच्या नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्राचे वाटप विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, राजेंद्र गोंदकर, कैलास कोते, अभय शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते, योगेश गोंदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विखे म्हणाले, पक्ष संघटना बळकट झाली तरच पक्षाचा जनाधार अधिक वाढेल. सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष हा फक्त भाजप आहे. शिर्डीचा विकास करताना रोजगार उपलब्ध व्हावा हा प्रयत्न आहे. औद्योगिक वसाहत, पशुवैद्यकीय महाविद्यालय, विमानतळाचे विस्तारीकरण, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्या योजना, थिमपार्क हा आपल्या विकासाचा अजेंडा आहे. या सर्व प्रक्रियेला राज्यातील महायुती सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे. सुंदर शिर्डी करताना ती सुरक्षित राहण्यासाठी, अवैध धंद्ये रोखण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले. याप्रसंगी रवींद्र गोंदकर, अभय शेळके, कैलास कोते, नितीन दिनकर, राजेंद्र गोंदकर यांची भाषणे झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तदान शिबिरात २०० जणांचा समावेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिर्डीच्या चार मंडलामध्ये आयोजित महारक्तदान शिबिरात २०० हून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबिर झाले.