महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीमुळेच मराठा आरक्षण गेल्याचा आरोप विखे पाटलांनी केला आहे. किमान समान कार्यक्रमात फक्त वसुलीच झाली बाकी काहीच झाले नाही. महाराष्ट्राने एवढं भ्रष्टाचारी सरकार कधी पाहिलं नव्हतं, अशी टीकाही त्यांनी केली आहे. गेल्या अडीच वर्षात काहीही झालं तरी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. मग मविआचे मंत्री काय करत होते भजे तळत होते का? असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा- कराड : एकनाथ शिंदे हे सामान्यांची जाणीव असणारे मुख्यमंत्री ; मंत्री शंभूराज यांचा विश्वास

बाळासाहेब थोरातांना टोला

निळवंडे धरणाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. त्याचे श्रेय दुसरे कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. उजवा आणि डाव्या‌ कालव्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही म्हणत त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देखील टोला लगावला आहे. पूर्वी आपण पारंतत्र्यात होतो अशी जनतेची भावना झाली होती. मात्र, आता त्यांना स्वातंत्र्य मिळाल्या सारखे वाटत आहे, असं म्हणत विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

हेही वाचा- “आदित्य ठाकरेंचा दौरा घर ते कार्यालय, कार्यालय ते घरापर्यंत नाही”; नीलम गोऱ्हेंचा तानाजी सावंतांना टोला, म्हणाल्या…

वाळू माफियांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विखे पाटलांनी वाळू माफियांना देखील इशारा दिला आहे. वाळू माफीयांचा माज उतरवणून त्यांच्यावर कडक कारवाई करणार, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन धोरण तयार करणार, असा इशारा यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील काळात वाळूच्या तस्करीवर चाप लागण्याची शक्यता आहे.