उद्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी त्यांनी एबीपी माझा यावृत्त वाहिनीशी बोलताना मंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. साईबाबाच्या आशीर्वादाने मिळेल ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – उद्या महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार? राजकीय हालचालींना वेग

“साईबाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेत. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपल्याला साईबाबांनी दिला आहे. त्यामुळे जे त्यांच्या मनात आहे, ते होईलच”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – माफीचा साक्षीदार असल्याने सचिन वाझे यांच्या जीवाला धोका – तळोजा कारागृह प्रशासनाचा दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे.