कृषिमूल्य आयोगाकडून जाहीर आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने शेतक ऱ्यांकडून शेतीमाल खरेदी केला जातो. सरकारच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा शेतमाल या ना त्या कारणाने नाकारला जातो. मात्र, हाच शेतीमाल व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो. सरळसरळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहे. खरे तर शेतीमाल खरेदी-विक्री अधिनियमनाची अंमलबजावणी होत नसल्याने संबंधितांविरुद्धच शेतीमालावर दरोडे घालण्याचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बाजार समित्यांचे संचालक मंडळ, सचिव हे सगळे मिळून शेतीमालावर दरोडा घालत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. गेल्या आठवडय़ात जिल्हा उपनिबंधक व फेडरेशनचे अधिकारी यांना झालेल्या मारहाण प्रकरणात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दरोडय़ाचे गुन्हे दाखल करून संघटनेच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. २०-२५ हजारांचा शेतीमाल विक्रीस आणणारा शेतकरी अधिकाऱ्याच्या खिशातील चौदाशे रुपये चोरू शकतो का, असा सवालही पाटील यांनी केला. पोलिसी खाक्या दाखवून शेतकरी संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष अमृत िशदे, दत्ता कदम, वैजनाथ रसाळ, लक्ष्मण शेरे, किशोर जोशी आदींनी पोलिसांची भेट घेऊन शेतक ऱ्यांवर दरोडय़ाचे गुन्हे दाखल करून दहशत पसरविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.