सांगली : कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांना सूरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे सांगली शहर जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी काँग्रेस भवन परिसरात साखर वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

माध्यमांशी बोलताना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, या निर्णयामुळे राहूल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल झाली आहे. भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने सत्याचा, संविधानाचा व प्रेमाचा विजय झाला आहे. जोपर्यंत अंतीम निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत शिक्षेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करताना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे कोणतेच कारण दिसत नाही अशी टिप्पणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी नगरसेवक मयूर पाटील, तोफिक शिकलगार, बिपीन कदम, सनी धोत्रे, रवींद्र खराडे, एन. डी. बिरनाळे , ताजुदिन शेख, वसीम रोहिले, सीमा कुलकर्णी, विठ्ठलराव काळे, श्रीधर बारटक्के, सिद्धार्थ माने, देशभूषण पाटील, सचिन चव्हाण, योगेश पाटील, विश्वासराव यादव, शिवाजी सावंत, गौतम निरंजन व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.