स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या तर शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला आहे.

हेही वाचा – राहुल गांधींवर कारवाई होणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. तर संजय राऊतांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ते नुसतं बोलतात, दरवेळेस राहुल गांधी येऊन सावरकरांबद्दल वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते ते गेल्यावर एखादं काही वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेसाठी त्यांच्याच सोबत आहेत. हे सावरकरांसाठी सत्ता कधीच सोडू शकत नाहीत.” असं फडणवीसांनी टीव्ही 9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत? –

“राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असं संजय राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय की वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चिखली नाक्यावर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले राहुल गांधी?-

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून दोन दिवसांपूर्वी हिंगोलीमध्ये यात्रेतील सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आपली भूमिका मांडली. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटिशांची माफीही मागितली होती, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. याच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं एक पत्रही दाखवलं. त्यामुळे या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.