माढ्याचे पार्सल परंडा-भुम-वाशी विधानसभा मतदार संघातील जनता अजिबात स्वीकारणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी व्यक्त केला. परंडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार राहुल मोटे यांनी चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी कॉंग्रेस रॉष्ट्रवादी आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत . त्यांच्या प्रचारार्थ मंगळवार ऑक्टोबर राजी हाजारो कार्यकार्यांच्या उपस्थितीत भुम येथे सभेचे आयोजन केले होते .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांपासून व्यापारी गोरगरीब जनता कोणीही भाजप सेना सरकारवर समाधानी नाही. आघाडी सरकारच्या काळात सर्वजण समाधानी होते. सध्या केंद्रातील व राज्यातील युती सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा टोला मोटे यांनी लगावला. पालक मंत्री तानाजी सावंत हे मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करीत मतदारसंघात फिरत आहेत. त्यांना या मतदार संघातील जनताच धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये मारलेल्या काट्यातील पैसे ते बचत गटांना वाटत असल्याचे आरोप वैशाली मोटे यांनी यावेळी केला . परंडा तालुक्यात दोन आमदार दोन माजी आमदारांचे पुत्र विरोधात असतानाही या तालुक्यातून राहुल मोटे यांना २० हजारावर मताधिक्य देणार असल्याचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आमदार विक्रम काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिवनराव गोरे, वैशाली मोटे, सक्षणा सलगर, अमृता गाढवे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि हाजारो मतदार मोठया संख्येने उपस्थित होते .

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul mote tanaji sawant vidhan sabha paranda bhum election nck
First published on: 02-10-2019 at 12:57 IST