उमरगा शहरात डान्स बारवर छापा; ७ बारबालांसह १९ जणांना अटक

शासनाने ग्राहकांच्या मनोरंजनासाठी दिलेल्या ऑर्केस्ट्राच्या परवानगीच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा मागील दोन वर्षांपासूनचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

शासनाने ग्राहकांच्या मनोरंजनासाठी दिलेल्या ऑर्केस्ट्राच्या परवानगीच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा मागील दोन वर्षांपासूनचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी या डान्स बारवर धाड टाकून शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचा भंग केल्याप्रकरणी ७ बारबाला, १० पुरुष, बारमालक, कामगार यांच्यासह १९ जणांविरुद्ध उमरगा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उमरगा-लातूर रस्त्यावरील हॉटेल सौदागर ऑर्केस्ट्रा बारवर शनिवारी रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे यांनी छापा मारून १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या डान्स बारला उमरगा पोलिसांनी परवानगी नाकारली असतानासुद्धा चक्क मंत्रालयातून परवानगी आणून हा डान्सबार गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. वास्तविक या बारला मनोरंजन करण्यासाठीचा परवाना असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच परवान्यावर डान्स बार चालवला जात होता. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने दिलेल्या अटी व नियमांचा भंग करून हा बार राजरोसपणे चालू होता. बारच्या स्थापनेपासून ही प्रथमच कारवाई करण्यात आली. यापूर्वी वरिष्ठांच्या आशीर्वादाने बिनबोभाट हा प्रकार चालू असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. सौदागर ऑर्केस्ट्रा व बारचा मालक नियमांचा भंग केल्यामुळे या ऑर्केस्ट्रा व बारची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या भागातील विविध सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raid on dance bar in umarga 19 arrest

ताज्या बातम्या