रायगड जिल्ह्य़ातील ३३ अनधिकत शाळा असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या शाळांमधे पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि शाळा सुरू झाल्यावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
   जिल्ह्य़ातील ३३ अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक १० पनवेल तालुक्यात आहेत. त्या खालोखाल कर्जत तालुक्यात  सात, उरण येथे चार, खालापूर येथे चार, रोहा येथे दोन, महाड येथे दोन,  पेण येथे दोन आणि माणगाव येथे दोन अनधिकृत शाळा आहेत. यातील चार शाळा या मराठी माध्यमाच्या तर उर्वरीत सर्व इंग्रजी माध्यमाच्या आहेत
    या शाळांमधे प्रवेश घेतला तर मुलांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.तसेच या शाळांमधे प्रवेश घेतला तर त्याला पालक सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले आहे. अनधिकृत शाळामंधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी शासन स्विकारणार नसल्याचे यात नमूद करण्यात आले.
  महत्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील शाळांच्या शाळांना सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. बहुतांश शाळातील प्रवेशपक्रिया आता संपुष्टात आल्या आहे आणि आता प्राथमिक शिक्षण विभागाने ही अनधिकृत शाळाची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या दिरंगाईला अथवा तत्परतेला काय म्हणावे हा प्रश्न पालकांना पडला आहे. मुळातच शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी मे महीन्याच्या सुरवातीला जाहीर करणे गरजेचे आहे. कारण या नंतरच मुलांची प्रवेश प्रक्रीया सुरु होत असते. मे महीन्यात जर ही यादी प्रसिद्ध केली असती तर कदाचित पालकांनी या शाळांमधे आपल्या मुलांचे दाखले घेतले नसते. आणि मुलांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले नसते. आता प्रवेश प्रक्रीया बंद झाल्याने मुलांना इतर शाळामंधे प्रवेश मिळणही कठीण होणार आहे.
  मुळात आधी शाळा सुरु करायची आणि नंतर शाळेच्या मंजुरीसाठी अर्ज दाखल करायचे अशी पद्धत सध्या शिक्षणविभागात रुढ झाली आहे. ही पद्धत मुलांच्या भवितव्यासाठी घातक ठरते आहे. अनधिकृत शाळांना परवांनगी न घेता विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यावर बंदी घातली तर हा प्रश्न निकाली निघु शकणार आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबत ठोस पावले उचलणे गरजेच आहे.
   मुलांना शाळेत टाकण्यापुर्वी शाळा अनधिकृत आहे की अनधिकृत याचा उलगडा होऊ शकत नाही. जर  एखाद्या पालकानी विचारलेच तर आम्ही प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरच परवांनगी मिळेल अशी उत्तर दिली जात असल्याचचे समोर आले आहे.

जिल्ह्य़ातील अनधिकृत शाळा
जिल्ह्य़ातील ३३ अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक १० पनवेल तालुक्यातील शाळा आहेत. त्या खालोखाल कर्जत तालुक्यात  सात, उरण येथे चार, खालापुर येथे चार, रोहा येथे दोन, महाड येथे दोन,  पेण येथे दोन आणि माणगाव येथे दोन अनधिकृत शाळा आहेत. यातील चार शाळा या मराठी माध्यमाच्या तर उर्वरीत सर्व इंग्रजी माध्यमाच्या आहेत.