कुर्डूवाडीजवळ जिंती रोड रेल्वेस्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-जयपूर एक्स्प्रेसवर पडलेल्या सशस्त्र दरोडय़ाच्या वेळी दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू असताना तेथे हजर राहूनही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौघा लोहमार्ग पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी ही माहिती दिली.
दोन दिवसांपूर्वी कुर्डूवाडी-दौंडच्या दरम्यान जिंती रोड येथे सिग्नलसाठी थांबलेल्या यशवंतपूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये १०-१५ सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून प्रवाशांना विशेष महिला प्रवाशांना मारहाण करीत व त्यांचा विनयभंग करीत सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला होता. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू असताना त्याच ठिकाणी सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी दरोडेखोरांना न रोखता व प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता त्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यात चौघा लोहमार्ग पोलिसांची कर्तव्यकुचराई आढळून आली. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway robbery near kurduwadi 4 rail police suspended
First published on: 03-07-2014 at 04:05 IST