scorecardresearch

सांगली: ढगाळ वातावरणानंतर मिरज परिसरात पावसाची हजेरी

पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे.

सांगली: ढगाळ वातावरणानंतर मिरज परिसरात पावसाची हजेरी

सांगली : दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी सायंकाळी मिरज परिसरात पावसाने हजेरी लावली. पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ हवामान आहे. बुधवारी तर दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. जिल्ह्याचे तपमान किमान २२ तर कमाल ३२ सेल्सियस आहे. आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाऊस तुषार स्वरुपात झाला. यामुळे फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष घडाच पाणी साचून दावण्याचा धोका वाढला आहे. तर हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असली तरी शाळूला हलका पाऊस व ढगाळ हवामान लाभदायी ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या