scorecardresearch

Premium

“साहबने बोला हैं हारने को, वर्ल्डकपच्या फायनलमधील संघाला…”, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Raj Thackeray WC Final
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतल्या भारताच्या विजयावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. (PC : @cricketworldcup.X)

भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकला आहे. बुधवारी (१५ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला दुसरा सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात विजयी होणारा संघ रविवारी अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताशी दोन हात करेल. या सामन्यात विजयी होणारा संघ यंदाचा विश्वचषक उंचावेल. दरम्यान, उपांत्य फेरीतल्या भारताच्या विजयावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. राज ठाकरे यांना देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आगमी लोकसभा निवडणूक आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न विचारण्यात आले. निवडणूक काळात पक्ष मतदारांना वेगवेगळी अमिषं दाखवत आहेत. परंतु, निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षांवर आक्षेप घेतोय असं बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राजर ठाकरे यांनी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं उदाहरण दिलं.

Central Election Commission disclosed the appointment of Pune District Collectors
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने केला ‘हा’ खुलासा
aditya thackeray marathi news, aditya thackeray eknath shinde marathi news
आदित्य ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, शाखांना भेटी देण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
sharad pawar led ncp will not merge with congress
काँग्रेसला दुखवू नका!, शरद पवारांची पदाधिकाऱ्यांना सूचना, पक्ष विलीनीकरणाच्या वृत्ताचे खंडन
Jaya Bachchan set for 5th Rajya Sabha term
जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज; आतापर्यंत कशी राहिली संसदीय कारकीर्द?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गंमतीत म्हणाले, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. तर आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी (दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया) जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. मला वाटतंय, बहुदा त्यांच्यापैकी जिंकेल त्या संघाला सांगतील, साहबने बोला हैं हारने को (साहेबांनी पराभूत होण्यास सांगितलं आहे) असंही सांगितलं जाऊ शकतं.

हे ही वाचा >> “भाजपाचं सरकार आणा अन् रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या”, अमित शाहांच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर त्यांना विचारण्यात आलं की, भारताने यंदाचा विश्वचषक जिंकणं हा आगामी निवडणूक जिंकण्याच्या रणनीतिचा भाग असू शकतो का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, नाही, लोकसभेच्या निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. जनता चांद्रयानच्या बातम्या विसरली. लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धा विसरतील. रोज इतक्या बातम्या आपण पाहतो, आपल्या मोबाईलवर इतक्या बातम्या दिसतात की लोकांना हे सगळं लक्षात ठेवायला वेळ नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray statement on world cup 2023 final connection with elections asc

First published on: 16-11-2023 at 14:09 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×