Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Sabha Updates बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजीतून शिकले. त्यांच्या मराठी प्रेमावर कुणी शंका घेणार आहात का? असा सवाल राज ठाकरेंनी आज विजय उत्सवात विचारला आहे. दक्षिणेतले अनेक नेते, त्यांची मुलं हे सगळे इंग्रजी माध्यमातून शिकले. त्यांचं भाषेवरचं प्रेम कमी झालं का? असाही सवाल राज ठाकरेंनी विचारला. तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली असं जे राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना विचारला जातो त्यावर राज ठाकरेंनी विचारला आहे.
बाळासाहे ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले-राज ठाकरे
माननीय बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, इंग्रजी वर्तमान पत्रात व्यंगचित्र काढत होते. पण मराठीच्या अभिमानाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. असं राज ठाकरेंनी म्हटलं, तसंच यांचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीपातींमध्ये लढवण्याचं असेल तेव्हा सावध राहा असंही राज ठाकरे म्हणाले.आज मराठी म्हणून एकत्र आला आहात. महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आला आहे. यांचं पुढचं राजकारण हे जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. मराठी म्हणून तुम्हाला हे एकत्र येऊ देणार नाहीत. जातीपातींमध्ये विभागायला सुरुवात करतील.
मीरा रोडला व्यापाऱ्याच्या कानफटीत मारली, त्याच्या कपाळावर लिहिलं होतं का गुजराती आहे?
मीरा रोडला व्यापाऱ्याच्या कानफटीत मारली, त्याच्या काय कपाळावर लिहिलं होतं का तो गुजराती माणूस आहे? बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. अजून तर आम्ही काहीच केलेलं नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठी भाषा आली पाहिजे, विनाकारण मारामारी करायची गरज नाही. पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. चूक समोरच्यांची असली पाहिजे. शिवाय अशा गोष्टी कराल तेव्हा व्हिडीओ काढू नका. उठसूट कुणाला उगाच मारु नका. अनेक गुजराती लोक आहेत, माझे मित्र आहेत खूप चांगले आहेत.
माझे मित्र आहेत नयन शाह त्यांना मी गुजराठी म्हणतो
माझे एक मित्र नयन शाह म्हणून त्यांना गुजराठी म्हणतो. कारण मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा अस्खलित बोलतो. शिवाजी पार्कला तो पु.लं देशपांडे यांच्या कथा ऐकतो. मी मराठीबाबत इतका कडवट का झालो ते तुम्हाला सांगतो. १९९९ मध्ये शिवसेना भाजपा यांचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. त्यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. शिवसेना भाजपामध्ये वाद चालला होता. एके दिवशी मी मातोश्रीला बसलो होतो अचानक गाड्या लागल्या. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली त्यांनी सांगितलं बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं. मी त्यांना सांगितलं ते आत्ता झोपले आहेत. त्यांनी सांगितलं अर्जंट आहे मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला आहे. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलं आहे. मी निरोप घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं काका उठ, माझ्याकडे त्यांनी बघितलं. मला म्हणाले काय? जावडेकर वगैरे आलेत. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं आहे असं ठरतंय. बाळासाहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मराठी माणूसच बसेल. दुसरा कुणी नाही. मराठी या विषयासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्याच्यावर झाले