पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. तसे शपथपत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर आता लवकरच साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेसला हिंदूत्वाचा एवढा तिटकारा का आहे? तुमचे सरकार असताना तुम्ही हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची तयारी का दर्शवली नाही, असे सवाल केले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> पालघर साधू हत्याकांड प्रकरण : महाराष्ट्रा सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार

पालघर साधू हत्याकांडामध्ये आमच्या साधूंना अत्यंत क्रूरतेनं ठार करण्यात आलं. महाराष्ट्रासह देश व्यथित होता. आजही तो प्रसंग आठवला की जेवण जात नाही. हृदयाला वेदना होतात. देशातील सर्व साधू-संत रस्त्यावर उतरले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी या साधूंना न्याय दिला नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा, अशी मागणी हे साधू करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी हा खटला अहंकारापोटी सीबीआयकडे दिली नाही. त्यांनी साधू-संतांना न्याय दिला नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

हेही वाचा >>> Shinde vs Thackeray: ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ मिळाल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठवला ई-मेल

आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने हिंदूंचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पालघरच्या साधूंना न्याय मिळणार आहे. हा खटला सीबीआयकडे सोपवण्यास हरकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात सरकारने सांगितले आहे. मात्र उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आमच्या हिंदुत्वाचा तिरस्कार का? याचे उत्तर द्यावे लागेल. हे दोन वर्षांपूर्वीच तुम्हाला करता आले असते. मात्र आता आम्ही त्यांना आता न्याय देत आहोत. दोन वर्षांपूर्वी तुम्ही हा न्याय का दिला नाही? असा सवाल राम कदम यांनी केला.

हेही वाचा >>> Shinde vs Thackeray: ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या “निखारा असलेला…”

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडली?

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यास आमची हरकत नाही. आम्हाला कोणताही आक्षेप नाही, अशी भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे. तसे शपथपत्रही सरकारने न्यायालयाला सादर केले आहे.

हेही वाचा >>> शिंदे गटाने पक्षाच्या नावात आनंद दिघेंचा उल्लेख न केल्याने ठाकरे गटाकडून टोला; म्हणाले, “मोदी, शाहांचे…”

नेमके प्रकरण काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.