राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळत नाही. काँग्रेस हा निवडून न येणारा पक्ष आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष पद सोडायला नको होतं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सामना करण्याची हिंम्मत ठेवायला हवी होती. पण, त्यांच्यात ती हिंम्मत नाही. कारण, नरेंद्र मोदी हे ताकदवान नेते आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा-  “तुम्ही त्यांचं नाव सांगाच,” आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जाहीर आव्हान

रामदास आठवले म्हणाले की, राज्यातून काही उद्योग गुजरातला गेले आहेत. काँग्रेस च्या काळात देखील गेले होते. उद्योजकांना बळजबरी करता येत नाही. उद्योग इथेच टाका अस म्हणता येत नाही. तसा कायदा ही नाही. गुजरातमध्ये भाजपा बलवान पक्ष आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकल्प घेऊन गेले असं मला वाटत नाही. त्यामुळं राज्यातील कुठला उद्योग गुजरातला घेऊन गेले म्हणून त्यांना फायदा होणार आहे? असेही आठवले म्हणाले.

दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. तसे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यामुळं आरपीआयची वर्णी नक्की लागेल. असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबई महानगर पालिकेत सत्ता आल्यास आरपीआयला उपमहापौर पद द्यावं. पुण्यात देखील आरपीआय पक्षाचा उपमहापौर होता. तशीच अपेक्षा मुंबईबाबत आहे, असेही आठवले म्हणाले.

हेही वाचा- तीन लाख कोटींचा ‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्रात होणार की नाही? केरळचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले “प्रकल्प पूर्णपणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद नाही. काँग्रेस हा निवडून न येणारा पक्ष आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडायला नको होतं. मोदींच्या विरोधात सामना करण्याची हिंमत ठेवायला हवी होती. पण, त्याच्यात ती हिंमत नाही. मोदी हे ताकदवान नेते आहेत. २०२४ मध्ये ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील अस नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील. त्यांच्या मंत्रिमंडळात मी नक्की मंत्री असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले की, भाजप आणि राज ठाकरे एकत्र येतील अस मला अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांची भाषण चांगली असतात. त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, असे देखील आठवले म्हणाले.