सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गुणवत्ता पाहूनच दुस-यांदा उमेदवारी असावी. या निवडणुकीत निंबाळकर हे दोन लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून येतील असा दावा सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, “शिवतीर्थावर हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला….”

Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Shiv Sena shinde group leaders Upset Over Archana Patil s Nomination in Dharashiv Lok Sabha Constituency
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीनंतर शिंदे सेनेमध्ये रोष, आरोग्यमंत्री सावंत यांचे समर्थक विरोधात

सोमवारी, सायंकाळी माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपने दुस-यांदा उमेदवारी जाहीर केलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थनार्थ महायुतीची बैठक आयोजिली होती. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे कुटुंबीय प्रचंड नाराज झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्या पाठोपाठ दुस-या दिवशी निंबाळकर यांच्या समर्थनासाठी माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे बैठक झाली. खासदार रणजितसिंह  निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माणचे आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह माजी आमदार दीपक साळुंखे आदींना या बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते.

हेही वाचा >>> सातारा:उदयनराजेंना भाजपाने उमेदवारी नाकारलेली नाही ; चर्चेसाठी गिरीश महाजन साताऱ्यात

ही बैठक सुरू होण्यापूर्वी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार निंबाळकर हे दोन लाखांपेक्षा.अधिक मताधिक्य घेऊन निवडून येतील, असा दावा केला. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले मोहिते-पाटील कुटुंबीय दोनच दिवसात शांत होतील आणि भाजपची ठरलेली शिस्त पाळून खासदार निंबाळकर यांचा प्रचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागील पाच वर्षात खासदार निंबाळकर यांनी माढा मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणून रस्ते, पाणी, वीज आदी विकासाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यांच्यावर तरूणवर्ग फिदा झाला आहे. म्हणून त्यांच्या विजयाची वाट कोणालाही रोखता येणार नाही, असाही विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.