भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी, उदगीर : पर्यावरणीय लेखनात संशोधन करून ते लोकांसमोर मांडण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती नाही, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रणच आहे, पर्यावरण नाही’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे गोमटेश्वर पाटील, औरंगाबादचे अनिरुद्ध मोरे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, डॉ. अनिता तिळवे तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे व्यासपीठावर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देऊळगावकर म्हणाले, संतांचा फक्त जयघोष आणि उदोउदो करण्याची मराठी साहित्यिकांची वृत्ती आहे. हे एक प्रकारचे थोतांड आहे, प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचे अनुकरण कुणीच करत नाहीत. जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या तर यात आघाडीवर आहेत. आपल्या प्रगतीच्या व्याख्येतच काहीतरी खोट आहे. मराठी साहित्यिक  निसर्ग आणि पर्यावरण या विषयावर लिहिताना केवळ स्वत:च्या अनुभवाचा आणि जीवनाचा विचार करतो, त्यापलीकडे जाऊन पर्यावरणावर संशोधनात्मक लिखाण होत नाही. परखड असले तरी सत्य हेच असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research environmental writing research marathi writers opinion of atul deulgaonkar ysh
First published on: 24-04-2022 at 00:02 IST