जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-यावल रस्त्यावरील एका दुकानात सिनेस्टाइल दरोडा टाकण्यात आला आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांनी सिनेस्टाइल दरोडा टाकला आहे. आरोपींनी दुकानाचं शटर उचकटून तीन लाखांची रोकड लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

चोपडा-यावल रस्त्यावरील ‘समर्थ ट्रेडर्स’ नावाच्या दुकानात हा दरोडा टाकण्यात आला आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानातील तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक केके पाटील यांनी सांगितलं की, “चोपडा-यावल रस्त्यावरील कॉलेजच्या बाजुला ‘समर्थ ट्रेडर्स’ नावाचं दुकान आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास येथे तीन अज्ञात लोक मोटरसायकलवरून आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता, चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील ड्राव्हरमध्ये ठेवलेली तीन लाखांची रोकड लंपास केली.