खासदाराच्या घरावरच चोरांनी डल्ला मारल्याची घटना चंद्रपूरमध्ये समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थेट काँग्रेसचे खासदार असणाऱ्या बाळू धानोरकरांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि त्यांनी या प्रकरणात तिघांना अठक केलीय. यावेळी तपासामध्ये चोरट्यांनी खासदाराच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरांच्या हाती काहीही ऐवज लागला नाही. त्यामुळेच संतापलेल्या चोरांनी बंगल्यातील वस्तूंची नासधूस केली आणि सामानाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. थेट खासादराच्या घरात चोर शिरल्याने सामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी हा चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी चोरांनी घराची रेकी केलेली. घरामध्ये कोणीही नाही या उद्देशाने त्यांनी घरावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. धनोरकरांच्या सूर्यकिरण नावाच्या बंगल्यावर हा संपूर्ण प्रकार घडलाय. चोरांनी मुख्य दाराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सूर्यकिरण याच बंगल्यात आधी धानोरकरांचं कार्यालयही होतं. मात्र आता त्यांचं कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. राहण्यासाठी धनोरकर हाच बंगला वापरतात. त्यामुळेच घरी कोणी नसल्याचं पाहून चोरांनी हा डल्ला मारल्याचं स्पष्ट होत आहे.

Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
praniti shinde question photos of pm narendra modi
खतांच्या बॅगांवर मोदींचा फोटो, आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे मुश्किल; प्रणिती शिंदे संतापल्या
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

खासदाराच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी दोन घरफोड्या केल्याची माहिती समोर आलीय. टीव्ही ९ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी आहेत. बंगल्यामधील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आलं. या बंगल्यामध्ये कोणातेही मौल्यवान साहित्य नसल्याने चोरांचा डाव फसल्याने धानोरकर यांना मोठं नुकसान झालं नाही. मात्र चोरांनी बंगल्यात फार नासधूस केलीय.