सोलापूर लोकसभा जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये जुंपली आहे. या जागेवर काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलं आहे. यावरून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तू-तू-मै-मै रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

रोहित पवारांच्या विधानाबद्दल विचारलं असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “कोण रोहित पवार? त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अजून ते मॅच्युअर नाहीत, त्यांना वेळ द्या. काही लोकांत पोरकटपणा असतो,” असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा : “मंत्रीपद मिळाल्यावर ९ दारूची दुकानं उघडली, अन् समोर गतिरोधक बसवून…”, अजित पवारांचा भुमरेंना खोचक टोला

यावर आज ( ११ फेब्रवारी) रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना रोहित पवारांनी सांगितलं, “प्रणिती शिंदे या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी जमिनीवर राहणारा साधा कार्यकर्ता आहे, म्हणून मला कदाचित त्या ओळखत नसतील. विषय ओळखण्याचा आणि न ओळखण्याचा नाही. प्रणिती शिंदे या अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्या बोलून गेल्या; त्यांना तो अधिकारही आहे.”

“कार्यकर्त्यांना विनंती एवढीच की, एकमेंकात भांडण करण्यापेक्षा आपला विरोधी पक्ष हा भाजपा आहे. तसेच, बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे,” असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

हेही वाचा : “…म्हणून देवेंद्र फडणवीसांबरोबर एकत्र कारने प्रवास केला”, पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

“सोलापूरला गेल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका माध्यमांसमोर व्यक्त केली. सोलापूर लोकसभेची जागा, कोणाला मिळेल, याचा निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील. पण, पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेताना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं. मग तो निर्णय काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या बाजूने असेल,” असं रोहित पवारांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar react praniti shinde solapur lok sabha constituency ssa
First published on: 11-02-2023 at 20:35 IST