आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपाइंचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ निकम (५९) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने निकम यांना दोन दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे ते निकटवर्ती सहकारी होते. आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करताना रिपाइंची विविध पदे त्यांनी भूषविली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी संपूर्ण राज्याचा दौरा केला. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. राज्य शासनाच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये त्यांनी नोकरी केली. गतवर्षी एचएएलमधून त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निकम यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2013 रोजी प्रकाशित
आरपीआय नेते दादाभाऊ निकम यांचे निधन
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपाइंचे (आठवले गट) प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ निकम (५९) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने निकम यांना दोन दिवसांपूर्वी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
First published on: 10-03-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi leader dadabhao nikam passes away