scorecardresearch

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगानं घेतली दखल; रुपाली चाकणकर ट्वीट करत म्हणाल्या…

गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहेत.

rupali chakankar gautami patil
(फोटो – संग्रहित)

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. गौतमी एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना चोरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि तो व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहेत.

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित, कार्यक्रमात वस्त्रे बदलत असताना मोबाईलवर केली तयार

“लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असं ट्वीट करून रुपाली चाकणकर म्हणाल्या.

“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना मोबाइलवरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिकांकडून तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 10:02 IST